5. पुस्तक बिस्तक - Boring Sunday ( Top 3 Books )
तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या पुस्तकं- बिस्तक Series मध्ये तर याही आठवड्यात मी तुमच्यासाठी काही खास पुस्तकं घेऊन आलोय. सुरुवात करूयात आपल्या Series ला ज्याचं नाव आहे पुस्तक-बिस्तक.
7 Habits of Highly Effective People - Stephen R. Covey
या पुस्तकामध्ये 7 मुद्यांवर भाष्य केलं आहे. अशा 7 सवयी ज्या सवयी आपल्या आयुष्य बदलू शकतात. त्या 7 सवयी कोणकोणत्या आहेत या मी तुम्हाला सांगीन पण त्याचं विश्लेषण तुम्हाला पुस्तकात वाचावं लागेल कारण जर त्याचं विश्लेषण इथं सांगितलं तर पुस्तकात वाचण्यासाठी काहीच उरणार नाही.
1. कार्यतत्पर रहा.
2. प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला outcome काय मिळणार आहे ते लक्षात घेऊनच सुरुवात करा
3. आपल्या कामांची प्राथमिकता ठरवायला शिका.
4. आपण यशस्वी होणारच असा विश्वास बाळगा.
5. कोणताही मुद्दा आधी व्यवस्थित वाचा/ऐका त्यानंतर तो मुद्दा समजून घ्या
6. आपली ताकद अनेक ठिकाणी वाया घालवण्यापेक्षा एकाच ठिकाणी तिचा उपयोग करून चांगले outcomes मिळवा.
7. तुमच्यातील चांगलं व्यक्तिमत्त्व बाहेर पडण्यासाठी मनावर संतुलन मिळवा.
Train to Pakistan - Khushwant Singh
एखाद्या गावातील हिंदू आणि मुस्लिम समाजाचं नातं किती चांगलं असलं पाहिजे हे या पुस्तकातुन शिकण्यासारखं आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतरचं चित्र पुस्तकात रंगवलंय. एकीकडे शीख आणि मुस्लिम समुदायाची कत्तल सुरू होती. पण त्याचवेळी मनो माजरा नावाच्या गावात परस्परविरोधी चित्र होतं.
या गावात हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव नव्हता. इतकंच नाही तर गावातील बऱ्याच लोकांना हेसुद्धा माहीत नव्हतं की भारताला स्वातंत्र्य मिळालंय आणि भारत-पाकिस्तान फाळणी झाली आहे.या गावात एक हुकूम चंद नावाचा DCP येतो आणि गावातील शांतता बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसतो.
दुसरीकडे गावात जग्गा नावाचा एक गुंड असतो ज्याचं नूरण नावाच्या एक मुस्लिम मुलीसोबत प्रेमप्रकरण असतं.पण जग्गा आणि नूरण हे लपूनछपून भेटत असल्यामुळं गावात कुणालाच त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती नसते. गावातील नवीन DCP हुकूमचंद याला असं वाटत असतं की गावात असं काहीतरी घडावं ज्यामुळे गावातील शांतता भंग होईल.
इक्बाल सिंग नावाचा एक मुलगा येतो आणि गावातील माणसांना प्रश्न विचारतो की इंग्रज देश सोडून गेले आणि आपला देश स्वतंत्र झाला याबद्दल तुम्हाला काहीच आनंद वाटत नाही का ? त्यावर इमाम बक्ष नावाचा एक मनुष्य त्याला खूपच सुंदर उत्तर देतो " देश स्वतंत्र झाला म्हणून गरीब शेतकरी आणि कामगार यांच्या परिस्थितीत काही बदल होणार नाहीये. फरक इतकाच की आधी ते इंग्रजांचे गुलाम होते आणि आता भारतीयांचे गुलाम असणार आहेत.
पुस्तकामध्ये अजून 5 - 6 व्यक्ती आहेत जी तुम्हाला माहीत करून घ्यायची आहेत.आणि या व्यक्तींचा परस्परसंबंध तुम्हाला पुस्तकाचा पहिला भाग संपेपर्यंत लक्षात येईल.
DCP हुकूमचंद गावातील शांती भंग करण्यासाठी एक plan तयार करतो.पण याउलट पुढे जाऊन त्याला तो plan यशस्वी होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करावा लागतो.आणि तसंच होतं, गावातील शांती अबाधित राहते.पुस्तक खूपच complicated आहे पण हे पुस्तक प्रत्येक भारतीय व्यक्तीनं वाचणं गरजेचं आहे.
Top 15 Indian Books च्या यादीत हे पुस्तक 11 व्या स्थानी आहे. पुस्तकाची मांडणी इतकी सुंदर आहे की पुस्तकातले काही प्रसंग जसेच्या तसे चेहऱ्यासमोर उभे राहतात.
स्वामी - रणजित देसाई
माधवराव व त्यांचे सख्खे चुलते राघोबादादा यांच्या नात्याचं सुद्धा एक वेगळं कोडं आहे असं या कादंबरीत आपल्याला लक्षात येतं. माधवरावांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी खूप मोठे पराक्रम केले. असे असले तरी दुर्दैवाने माधवरावांचे वयाच्या 27 व्या वर्षी निधन झाले आणि त्यामुळे मराठा साम्राज्याचा विस्तार होऊ शकला नाही.
माधवरावांचे निधन झाल्यानंतर रमाबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला. या कादंबरीतुन गृहकलह , स्वकीय शत्रू आणखी बरेच मुद्दे मराठा साम्राज्याच्या आडवे आले असे दिसून येते.
तर हि होती या आठवड्याच्या ३ पुस्तकांची brief summary मला खात्री आहे कि हि पुस्तक तुम्ही नक्की वाचाल.
अशाच दर्जेदार पुस्तकाची यादी द्यायला पुन्हा येईन मी पुढच्या रविवारी तोपर्यंत मला कळवायला विसरू नका वरची ३ पुस्तक वाचली का ? आणि वाचली असली तर तुम्हाला कशी वाटली.


1 टिप्पण्या
खुपच छान....
उत्तर द्याहटवातुम्हाला काही अडचण आल्यास मला संपर्क करण्यास विसरू नका.