6. पुस्तक बिस्तक - Boring Sunday ( Top 3 Books )

तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या पुस्तकं- बिस्तक Series मध्ये तर याही आठवड्यात मी तुमच्यासाठी काही खास पुस्तकं घेऊन आलोय. सुरुवात करूयात आपल्या Series ला ज्याचं नाव आहे पुस्तक-बिस्तक.


1. The Discovery of India - Pandit Jawaharlal Nehru

        1946 मध्ये भारतात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चळवळ सुरू होती.आणि त्यातच INC आणि इतर पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांना इंग्रजांनी तुरुंगात टाकलं होतं. जवाहरलाल नेहरू हेसुद्धा अहमदनगरच्या किल्ल्यात ब्रिटिशांच्या कैदेत होते त्याचवेळी त्यांनी The Discovery of India हे पुस्तक लिहिले.

          पुस्तकामध्ये प्राचीन काळापासून भारतामध्ये कोणकोणते बदल घडून आले हे सांगितले आहे.पुस्तकामध्ये 8 पाठ आहेत. Ancient India पासून British India पर्यंतचा भारताचा प्रवास यामध्ये सांगितला आहे. भारताला "सोने की चिडीया" का म्हणायचे या प्रश्नाचीसुद्धा पंडितजी उकल करताना दिसतात.

        पुस्तक खूपच चांगले आहे.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांनी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे.

2. An Era of Darkness - Shashi Tharoor

        खरंतर इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्यावेळी भारतीय लोकांवर अन्याय होत होता पण त्याचवेळी भारताची बाहेर जगामध्ये ओळख काय होती.इंग्रजांनी आपल्यावर राज्य केल्यामुळे भारताला कोणकोणते फायदे झाले यावर या पुस्तकात भाष्य केलं आहे. 

        इंग्रजांनी भारतामध्ये ज्या प्रकारे राज्य केलं आणि ईस्ट इंडिया कंपनीने भारतात जसा व्यापार केला त्यातून भारतीयांनी काय शिकलं पाहिजे यावर सुद्धा मंथन केलं आहे.                         
        पुस्तकामध्ये हेही सांगितलं आहे की ज्यावेळी इंग्रज भारतात होते त्यावेळी जगाच्या जीडीपी मध्ये भारताचं योगदान 23% टक्के होतं पण हीच टक्केवारी 1949 मध्ये 3 टक्क्यांवर जाऊन पोहोचली. इतरही अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

        शशी थरूर यांचं इंग्लीश वाचण्यासाठी जवळ एखादी चांगली dictionary घेऊन बसा असा माझा सल्ला आहे.


3. स्त्रीपुरुषतुलना - ताराबाई शिंदे 

        आजही स्त्री आणि पुरुष दोघांना समान वागणूक देण्याची मागणी समाजातील अनेक घटक करत असतात.अर्थातच चित्र बदलताना दिसतंय पण ते बाहेर जगास दाखवण्यासाठी, पण खरी परिस्थिती अशी नाहीये.

        आणि यावरच ताराबाई शिंदे यांनी या पुस्तकातून भाष्य केलं आहे.घरची सगळी कामं ज्यामध्ये भांडी घासणे , कपडे धुणे , जेवण करणे , घरातील माणसांच्या आवडीनिवडी जपणे , त्यांची आजारपणं काढणे , देवपूजा करणे ही सगळी कामं पुरुषांना कमी महत्वाची वाटतात.आणि ही कामं करणं म्हणजे त्यांच्यासाठी अपमानाची बाब असते. 

        तसेच कोणत्याही स्त्रीने नवऱ्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्यास तिच्यावर अरेरावी करणे , अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करणे , प्रसंगी मारहाण करणे यासारख्या गोष्टींना स्त्रियांना सामोरे जावे लागते. आजही बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडताना दिसतात.

        मोठमोठ्या राजकीय, कुटुंबामध्येसुद्धा स्त्रियांना काडीची किंमत नसते.स्त्रियांना सन्मान, आदर, प्रेम या गोष्टींची अपेक्षा असते खासकरून नवऱ्याकडून. 

        जेव्हा एखादी स्त्री लग्न करून घरात प्रवेश करते तेव्हा त्या घरातल्या फक्त एकाच व्यक्तीकडून तिला सहकार्याची अपेक्षा असते ती व्यक्ती म्हणजे तिचा नवरा.पण असं घडताना दिसत नाही.याउलट तिला पदोपदी अपमान आणि कुचेष्टेला सामोरं जावं लागतं. 

        एकूणच स्त्रियांच्या त्या वेळच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.पण तसं म्हटलं तर आजही परिस्थिती तशीच आहे त्यावेळीही महिलांना समाजात दुय्यम स्थान होत आणि आजही महिलांना दुय्यम स्थान आहे.

        फरक फक्त इतकाच आहे त्यावेळच्या महिला फार शिकलेल्या नव्हत्या आणि आज शिकलेल्या आहेत.मला असं वाटतं की  प्रत्येक पुरुषानं हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. ज्यामुळे आपला समाज परिवर्तित होईल आणि आपण समाजात स्त्रियांना एक आदराचं आणि मानाचं स्थान देऊ शकू.मला हे पुस्तक खूप आवडलं.हे पुस्तक नक्की वाचा.

        
तर हि होती या आठवड्याच्या ३ पुस्तकांची brief summary मला खात्री आहे कि हि पुस्तक तुम्ही नक्की वाचाल.

        अशाच दर्जेदार पुस्तकाची यादी द्यायला पुन्हा येईन मी पुढच्या रविवारी तोपर्यंत मला कळवायला विसरू नका वरची ३ पुस्तक वाचली का ? आणि वाचली असली तर तुम्हाला कशी वाटली.


My Instagram ID - @poemswithakshay
My Twitter ID - @AkshaySalunkheS
My Email ID - akshaysalunkhecivil@gmail.com