हिमालयीन पर्वतरांगा आणि Iron Man...............


खरंतर आपल्याला माहित आहे कि भारतात जगातली सगळ्यात उंच युद्धभूमी आहे ती म्हणजे सियाचीन आणि लडाख.जमिनीपासून याची उंची २१,००० फूट आहे आणि इथलं सरासरी तापमान हे -४५ अंश सेल्सिअस आहे जे रात्री जवळजवळ -७० अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचतं. आपण जर महाराष्ट्रातलं  सगळ्यात कमीतकमी तापमान जर बघितलं तर ते + १० अंश सेल्सिअस असतं.


        आणि अशा थंडीत गार वाऱ्याची एखादी झुळूक जरी आली तरी आपल्याला हुडहुडी भरते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण Secure वातावरणात असतो त्यामुळे आपली पहिली Priority असते ती म्हणजे थंडीला पळवणे आणि इथूनच एका Civilian आणि Soldier च्या Differentiation ला सुरुवात होते.


 एक Soldier एकावेळी अनेक गोष्टींशी लढत असतो खासकरून सियाचीन लेह आणि लडाख मध्ये सतत होणारे वातारणातले बदल, हवेतली Oxygen ची कमतरता, हिमवादळं (Avalanche / Snowstorm), हिमवर्षाव (Snowfall)  आणि सोबत असणारं सामान (Equipments and Gears) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा वातावरणाशी लढत शत्रूला तोंड द्यायचं.


        मध्यंतरी एका Newspaper मध्ये छापून आलं होत कि भारत सरकार सियाचीन मधल्या सैनिकांसाठी  एका दिवसाकाठी ५ कोटी रुपये खर्च करतं.एका सैनिकाला लागणाऱ्या सामनामध्ये  गरम कपडे, बूट, Snow Sticks / Snow Markers, Rifles, Transmission devices अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. खासकरून  Rifles मध्ये Anti Jamming Properties असणं फार महत्वाचं असतं.

        कारण अतिथंड वातावरणामुळं बऱ्याच वेळा Rifle Jam होते आणि Rifle च्या working वर आणि Efficiency वर खूप परिणाम होतो. आता तुम्ही एक शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल Hypothermia.हा एक असा रोग आहे ज्यामध्ये  शरीराचं तापमान वेगाने घसरण्यास सुरुवात होते. परिणामी सैनिकाला हाड गोठणे, पेंग येणे, गोंधळ उडणे, थकवा येणे अशा बऱ्याच समस्याना सामोरं जावं लागत.


2016 Siachen Glacier Avalanche

( २०१६ मधलं सियाचीन हिमनदीतील हिमवादळ ) 


        जर तुम्हाला आठवत असेल तर ३ फेब्रुवारी २०१६ ला सियाचीन मध्ये एक जोरदार हिमवादळ आलं होतं आणि त्या वादळामध्ये आपले १० जवान कितीतरी  फूट खोल बर्फामध्ये दबले गेले.खरंतर प्रत्येक जवानाकडे एक रेडिओ ट्रान्समीटर किंवा सिग्नल ट्रान्समीटर Device ज्याला म्हणतात ते असतं  परंतु वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होतोच.


 ४ ते ५ दिवस खोदकाम चालू होतं पण कुणाचाच पत्ता लागत नव्हता पाचव्या दिवशी रात्री उशिरा Rescue टीम ला २ मृतदेह सापडले.ज्याअर्थी पाच दिवस होऊन गेले होते त्याअर्थी कुणीही जिवंत सापडणार नाही असंच Rescue टीम ला वाटत होतं परंतु ६ व्या दिवशी रात्री Rescue टीम ला एक असा माणूस सापडला जो त्या भयाण थंडीत ३५ फुटाच्या एका दरडीखाली श्वास घेत होता. त्याच नाव होतं हनुमंतप्पा कोप्पड. 


        त्यानंतर लगेचच हनुमंतप्पा यांना  सियाचीन बेस कॅम्प मधल्या  एका Tent मध्ये नेण्यात आलं जिथं जवानाच्या उपचारासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. परंतु संध्याकाळ होत असल्यामुळे सियाचीन मधलं तापमान घसरायला लागलं होतं त्यामुळं हनुमंतप्पा ला एखाद्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये Shift करण्याची गरज होती पण रात्रीच्या वेळी  चेतक आणि ध्रुव हेलिकॉप्टर्स सियाचीन मध्ये flying करू शकत नसल्यामुळं Rescue  टीम ला सकाळ होण्याची वाट पाहावी लागली. 


सकाळ होताच हनुमंतप्पा यांना चेतक हेलिकॉप्टरच्या मदतीनं उधमपूर येथे हलवण्यात आलं आणि तिथून C-17 Globemaster च्या Special Flight ने दिल्लीच्या एम्स मध्ये. बराच वेळ मेंदूला रक्त आणि Oxygen याचा पुरवठा न झाल्यानं ते उपचारादरम्यान कोमात गेले आणि त्याच्या शरीरामध्ये Multiple Organ Failure झाल्यामुळे ११ फेब्रुवारीला ते शहिद झाले.


        आणि यानंतर एक गोष्ट सगळ्यांना प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे सियाचीन मध्ये पहिला आणि शेवटचा शत्रू आहे निसर्ग.सियाचीन मधल्या वातावरणाशी लढणं हे शत्रूशी लढण्यापेक्षाही अवघड काम आहे.पण त्या शत्रूला हनुमंतप्पा यांनी तब्ब्ल ५ दिवस अंगाखांद्यावर खेळवलं होतं.या Rescue Operation ची जगात चर्चा झाली कारण फक्त ८ दिवसांच्या या Rescue Operation मध्ये हेलिकॉप्टर्सच्या २०० फेऱ्या झाल्या होत्या. 

जवानांना बर्फाच्या दरडींखालून सोडवण्यासाठी १५० जणांची Specially Trained टीम तयार करण्यात आली  होती  वेगवेगळे Gears , Equipments , Doctors  यांची सुद्धा मदत झाली होती.आणि हनुमंतप्पा यांच्या पोलादी शरीराचं डॉक्टर्सना सुद्धा आश्चर्य वाटलं होतं.

खाली दिलेल्या चित्रांमधून तुम्हाला Avalanche येताना आणि आल्यानंतर ची स्थिती दोन्ही  मधला फरक दिसून येईल.

आणणाऱ्या अभेद्य पर्वतरांगांची आपल्या पोलादी बाहूंनी रक्षा करणाऱ्या हनुमंतप्पा कोप्पड यांना आणि सियाचीन मध्ये स्वतःच्या जिवाची तमा न बाळगता देशाची अविरत सेवा करणाऱ्या त्या तमाम जवानांना मी सविनय प्रणाम करतो.धन्यवाद.