काय झाली का तयारी दिवाळीची ?
अर्थातच झाली असणार. आता तुम्ही म्हणाल आज मी काय ज्ञान पाजळणार आहे, काळजी करू नका थोडंसं तुम्हाला आवडेल असंच काहीतरी सांगणार आहे.
चला सुरुवात करूया दिवाळी special -
दिवाळीची तयारी म्हणजे फराळ, किल्ला, कपडे आणि बरंच काही. पण माझ्यासाठी दिवाळी म्हणजे थोडीशी वेगळी आहे आणि काही आठवणी आहेत या दिवाळीशी जोडलेल्या. त्या आठवणी मी तुम्हाला नक्कीच सांगणार नाही. पण काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या मला त्या आठवणींमुळे उमगल्या.
दिवाळी ही सगळ्यांसाठी same नसते. म्हणजे हेच बघा ना काही लोकांसाठी दिवाळी दररोजच असते तर काही लोक दिवाळीदिवशी सुद्धा भूकेलेले असतात. काही मुलं दिवाळीचे 4-5 दिवस वेगवेगळे कपडे घालत असतात तर काही मुलं जुन्याच कपड्यांना ठिगळं लावून फिरत असतात.
काही आईवडील मुलांना कपडे घेऊन देतात आणि स्वतःच्या कपड्यांचे पैसे फराळाच्या सामानासाठी वापरतात. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील पण मित्रांनो यातून आपण काय घ्यायचं हे लक्षात घेऊ. आपली आई फराळ बनवते पण काही दिवसानंतर हा फराळ फेकून द्यायची वेळ येते. कारण कुणी खात नाही म्हणून ते पदार्थ खराब होतात. आणि बरीच लोकं फेकून द्यायच्या ऐवजी गरिबांना देतात.
आता हाच फराळ, हेच अन्न जर तयार झाल्यानंतर लगेच आपण गरजू लोकांना दिलं तर ? किती चांगली कल्पना आहे ना आणि यासाठीच मी यावर्षी ठरवलंय की जो काही फराळ होईल तो दिवाळीच्या पहिल्या दिवशी माझ्या शहरातील गरजू लोकांना देऊन येईन.
म्हणजे मला जेवढ्या लोकांना देणं शक्य होईल तेवढ्याना. आणि तुम्हाला हे जमत नसेल तर एखाद्या अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात जा आणि नुसता फराळ देऊन येऊ नका त्यांना बोलतं करा , त्यांना थोडं बरं वाटेल कारण त्यांना प्रेम आणि आपुलकी हवी असते.
हो आणि काही जणांना ही फालतूगिरी वाटत असेल, Publicity stunt वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. बरं माझ्या फराळाच्या पिशव्या तयार झाल्या आहेत मी उद्या जाणार आहे माझी दिवाळी साजरी करायला तीसुद्धा माझ्या पध्दतीने . काय तुम्हीपण येणार आहात ? मग घ्या पिशव्या भरा लगोलग.
टीप - दिवाळीमध्ये फटाके फोडू नका. दरवर्षी उत्तरप्रदेश येथील शिवकाशी येथे बरीच लहान मुले फटाके बनवताना जखमी होतात काही जणांचे कान बधिर होतात, हात निकामी होतात. आणि माझं म्हणाल तर मी 8 वर्षे झाली फटाके वाजवणं सोडलं आहे आणि फटाके न वाजवण्याची प्रतिज्ञा घेतली आहे त्यामुळे मी फटाके वाजवू शकत नाही.
आणि नेहमीप्रमाणे माझ्याशी संपर्क साधण्यासाठी खाली social media links दिलेल्या आहेत.
My Instagram ID - @poemswithakshay
My Twitter ID - @AkshaySalunkheS
My Email ID - akshaysalunkhecivil@gmail.com


0 टिप्पण्या
तुम्हाला काही अडचण आल्यास मला संपर्क करण्यास विसरू नका.