बघता बघता चार वर्षे कधी जातात कळतसुद्धा नाही खरंतर जेव्हा आपण पहिल्या दिवशी College ला येतो तेव्हा आपल्याला एकमेकांशी काहीच सख्य नसतं, आपण पूर्णपणे अनोळखी असतो.ही मुलगी कशी आहे किंवा हा मुलगा कसा आहे चांगला/चांगली आहे का ? वगैरे वगैरे खूप प्रश्न असतात आपल्या मनामध्ये.जाताना का कुणास ठाऊक पण आपल्याला एकमेकांबद्दल काहीतरी वाटू लागतं.

         मन निराश होतं आणि  परत पाठीमागे जाऊन त्या क्षणांना मिठी मारावी वाटते. ते क्षण हातात पकडलेल्या वाळूच्या कणांसारखे असतात आपण त्यांना जितकं घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो तितक्याच वेगानं ते आपल्या हातातून निसटून जातात. माझ्या सगळ्यात आनंददायी आठवणी 1st year मधल्या आहेत.आणि त्याचं कारण म्हणजे माझे काही लाडके मित्र. 

        उदाहरण सांगायचं झालं तर RAC ( Refrigeration and Air Conditioning ) च्या Topic ला  गोंदकर सरांनी  Compressor ची Diagram काढायला सांगितली. माझ्या एका मित्राने ती Diagram काढून सरांना दाखवली  तेव्हा सरांनी ती diagram अजगराची आहे असं सांगितलं. असंच एक दिवशी Chemistry चं Journal Complete करायचं राहून गेल्याच्या Tension मध्ये हाच मित्र Ladies Washroom मध्ये शिरला होता ( नशीब, Washroom मध्ये तेव्हा कुणीही नव्हतं ).

          Hostel मध्ये राहणारे बरेच मित्र अंघोळ न करता College ला यायचे. ( त्यावेळी हे नवीन होत पण आजकाल normal आहे ).आमच्याच एका हुशार मैत्रिणीने PC ( Professional Communication ) च्या Practical ला I like suffering and last year I have Suffered to त्र्यंबकेश्वर असं सांगितलं, तेव्हा माझे सगळे मित्र हसत होते. पण मला वाईट वाटत होतं कारण या वाहियात Batch सोबत मला एक वर्ष Suffer करायला लागणार होतं.

         Comman Off घेऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची असा Plan आमच्या Classroom मधल्या मुलांनी तयार केला, पण त्यापूर्वी आमच्याच Classroom मधल्या मुलींनी आमची व्यवस्थित लायकी कशी काढायची याची  Blue Print काढून ठेवली होती. परिणामी Comman Off च्या दिवशी जवळजवळ 25 मुली Practical जाऊन बसल्या आणि आमच्याऐवजी त्यांनीच एक वेगळी ओळख निर्माण केली. 

        वर्गात गटातटाचं राजकारण सुरू झालं होतं; एकीकडे मुलं आणि दुसरीकडे मुली. मुलींकडचं वातावरण Sorted होतं पण मुलांच्या Team मध्ये अजिबात एकी नव्हती. मुलांच्या गटात काय शिजतंय याची बित्तंबातमी कोणीतरी मुलींना कळवत होतं आणि माझ्यासारखे काही तटस्थ आणि निष्पाप जीव गरज नसताना यात भरडले जात होते ( म्हणजे आम्हाला त्यात Interest नव्हता ). 

        पहिली Semester झाली आणि या वादावर पडदा पडला. वर्गात अंदाधुंदी माजली होती.पहिली Semester All Clear झाल्यामुळे सगळ्यांनाच माज चढला होता.दुसऱ्या Semester ची सुरुवात काहीशी अशी झाली -- 

        काही मुलं रात्र-रात्र जागून मुलींना Sheet काढून देत होती तर काही जण Workshop मध्ये नजर चुकवून मुलींचे Job Finish करून देत होते. काही जण अफवा पसरवण्यात तरबेज झाले होते, काही जणांनी "झोलर" अशी उपाधी मिळवली होती, बऱ्याच जणांची एव्हाना नावं पडली होती त्यापैकी काही नावं म्हणजे MH50, सांगली-सांगली, आंधळीश, बुवा इत्यादी अनेक. आमचेच जवळचे मित्र गणेश बाबर हे मला अक्षय दादा अशी हाक मारत. 

        असंच एक दिवस दोन मित्रांची Branch वरून भांडणं झाली. एका मित्राने मॅडम ना विचारलं की मॅडम Electronics या विषयाचा CSE Branch शी काही संबंध असतो का ?  त्यावर मॅडम हो  म्हणाल्या Civil Branch च्या एका मित्राने विचारलं मॅडम आम्हाला यातलं काही पुढं असतं का त्यावर मॅडम काही म्हणायचं आधी CSE चा मुलगा म्हणाला तुम्हाला फक्त भिताडं बांधायची असतात ( मी पण Civil Branch चा आहे पण मला या वाक्याचा राग आला नाही ) त्यामुळं जास्त काही नाही झालं पण 15 मिनिटांसाठी शीतयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, नंतर सगळं शांत झालं.

        आणखी भरपूर गमतीजमती घडल्या. असंच एकदा Workshop मध्ये माझा एक जवळचा मित्र Shoes, Appron आणि Handbook तिन्ही वस्तू घेऊन यायला विसरला आणि हे कमी होतं म्हणून की काय त्याला यायला 15 मिनिटं उशीर झाला.आम्हाला माहीत पडलं की आपलं आज काही खरं नाही. आमची Batch खुशालचेंडू आणि विक्षिप्त होती, त्यामुळं एकाची जरी चूक असली तरी सगळ्यात शेवटी शिल्लक असलेला प्रसाद सगळ्यांवर उधळला जायचा. 

        सरांनी " मला माफ करा कोळेकर साहेब आपण उशिरा आलात कारण काल आपण Shoes, Appron आणि Handbook माझ्याकडे ठेवायला दिलं होतं पण मी आणायला विसरलो " अशा शेलक्या शब्दामध्ये माझ्या मित्राची लायकी काढली. सरांनी " साहेब नाश्ता केला का ? " अशी विचारणा केली. मला खूप हसू येत होतं आणि हसू आवरत नव्हतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यादिवशी Workshop मध्ये  फार काही Complete झालंच नाही. काही दिवसांनी lakshya Event होता. 1st year च्या मुलांसाठी Grand Event. यामध्ये फक्त college ची मुलंच असतात (तीपण फक्त 1st year ची) बाहेरची मुलं नसतात. 

        College मधल्या मुलांनी जास्तीत जास्त  Participate करण्यासाठी एक Certificate दाखवल्यावर termwork मध्ये 5 गुण वाढवून मिळतील असं आमिष दाखवण्यात आलं. परिणामी बऱ्याचजणांनी 2 Competitions मध्ये भाग घेतला (त्यातलाच एक गाढव मीपण होतो).

         तर काहीजणांनी 3 Competitions मध्ये भाग घेतला. नंतरपण काही Event होते पण जाऊदे.  (आमच्या College मधला Event म्हटलं की का कुणास ठाउक Excitement च निघून जाते सगळी, असो.).आमच्या वर्गात वेगवेगळ्या Branch ची मुलं होती, मुलं म्हणण्यापेक्षा नमुने होते आणि त्यामुळेच आमची Batch वैशिष्ट्यपूर्ण बनली होती. होस्टेल मधल्या मुलांची तर बातच काही और होती कारण माझ्या एका मित्राने सांगितल्याप्रमाणे हॉस्टेल मध्ये मुलं राहतच नसतात तर तिथं असे काही हिंस्त्र प्राणी राहतात की जे College येतात, ज्यांना बोलता आणि भरपूर खाता येतं.

        पण काहीही असलं तरी असे हिंस्त्र प्राणी माझे मित्र असणं मला अभिमानाची गोष्ट असल्यासारखं होतं कारण माझ्या कठीणसमयी यातलेच काही प्राणी माझ्याशी माणसासारखे वागले होते. खूप चांगल्या म्हणण्यापेक्षा मजेशीर आठवणी 1st year नी आम्हाला दिल्या. 1st year मध्ये आम्हाला सगळे शिक्षक खूपच मृदू स्वभावाचे भेटले (आणि चुकून एखादे सर/मॅडम Strict जरी असले तरी आमच्या Batch च्या गमतीदार मुलांसमोर त्यांचा राग हवेतच विरून जायचा.) 

        आणि चांगले शिक्षक मिळणं हाच आमचा Plus Point होता.1st year मधले मित्रसुद्धा Unique होते आणि तसे मित्र परत भेटले नाहीत.आज त्यातील काही मित्र माझ्या Contact मध्ये आहेत तर काही मित्रांचे Contacts माझ्याकडून गहाळ झालेत.असो.ही झाली माझी 1st year ची आठवण. तुम्हीसुद्धा तुमच्या 1st year मधल्या अशाच गोड आठवणी माझ्याशी Share करा आणि तुमच्या आठवणी मी तुमच्या नावाने माझ्या Blog वर नक्कीच प्रकाशित करीन.त्यासाठी माझा Email ID मी खाली दिला आहे. धन्यवाद

Email ID - akshaysalunkhecivil@gmail.com