साद.....


पहाटे पहाटे स्वप्नांमध्ये अलगदच येशील का ?
माझ्या मनातल्या अल्लड भावना कधीतरी समजून घेशील का ?

हृदयामधले तानसेन तुझंच गीत गात आहेत
मैफिल त्यांची रंगवण्याखातर वीणावादन करशील का ?

गुलाबाच्या बागेमध्ये "अबोली" बनून येशील का ?
मनातल्या उन्हामध्ये "सावली" माझी होशील का ?

चांदण्या रात्री नक्षत्र बनून आकाशात चमकशील का ?
अवकाळी पावसामधून गारांसारखी बरसशील का ?

ओहोटीतल्या समुद्रातली  डौलदार बोट होशील का ?
मला भेटण्याखातर पैलतीरावर येशील का ? 

मनापासून हाक दिलीये हृदय जिंकण्या तुझं 
घुसमट थांबवण्या माझी साद मला देशील का ?