तू आहेस......
तू आहेस प्रवास, तू आहेस ध्यास
तू आहेस सुंदर , तू आहेस निरंतर
तू आहेस आरशासारख निर्मळ पाणी
तू आहेस माझी दिवाळी पहाट गाणी
तू आहेस सण, तू आहेस वार
तू आहेस भर उन्हातला सरबत थंडगार
तू आहेस 'मनमोकळी', तू आहेस 'खरी'
तू आहेस माझ्या स्वप्नातली 'परी'
तू आहेस गोड, तू आहेस 'cute'
तुला पाहिल्यावर मी होतो कसा काय 'mute'
तू आहेस व्याकरणातल्या सुंदर सुंदर म्हणी
एकटक तुझ्याकडे बघताना मला पाहिलंय का गं कुणी
तू आहेस 'वटवृक्ष', तू आहेस 'छाया'
तुझ्याच विचारांमध्ये मी असतो 'खोया खोया'
------- अक्षय साळुंखे


0 टिप्पण्या
तुम्हाला काही अडचण आल्यास मला संपर्क करण्यास विसरू नका.