4. पुस्तक बिस्तक - Boring Sunday ( Top 3 Books )

तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या पुस्तकं- बिस्तक Series मध्ये तर याही आठवड्यात मी तुमच्यासाठी काही खास पुस्तकं घेऊन आलोय. सुरुवात करूयात आपल्या Series ला ज्याचं नाव आहे पुस्तक-बिस्तक.


1. आई समजून घेताना - उत्तम कांबळे

        आई समजून घेताना' हे उत्तम कांबळेंचे पुस्तक वाचताना आणखी एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी ताणत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. 

        लेखकाच्या आयुष्यात प्रकाशवाटा घडविण्यासाठी आयुष्यभर राबलेली लेखकाची 'अक्का' स्वत:साठी वर्तमान घडवू शकली नाही ही लेखकाची तक्रार. स्वत: अतिशय कष्ट घेऊन मुलांच्या वारेमाप खर्चामुळे अस्वस्थ होणारी आई. 

'तुझ्या लहानपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाच्या चॉकलेटचा एकच घास करतो. तुला मागचं दिवस कसं आठवत नाहीत' लेखकाला वारंवार भूतकाळात नेणारी लेखकाची आई. 

        भाकरीच्या तुकड्यासाठी लहाणपणाची लाचारी आठवायला लावायची, तोंडातून लाळ गळेपर्यंत विनवण्या आठवायला लावायची. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते.

        हे पुस्तक म्हणजे आईच्या मुलाच्या नात्याची एक हृदयस्पर्शी गोष्ट जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.पुस्तक वाचत-वाचत आपण शेवटच्या पानापर्यंत कधी येऊन पोहोचलो ते आपल्या लक्षातसुद्धा येत नाही.

Credit - bookganga.com


2. A Captain's Duty - Richard Phillips

        हे पुस्तक Captain Richard Phillips यांनी लिहिलं आहे.MV Maersk Alabama नावाची बऱ्यापैकी मोठी Container Ship घेऊन Captain Richard Philips निघाले असता रस्त्यात सोमालियन pirates त्यांच्या Container वर कब्जा करतात. Ship कोणतीही armaments नसल्याने Captain Richard Philips सोमालियन pirates ना रोखण्यात अपयशी ठरतात.

        पण तत्पुर्वी ते US Navy ला एक SOS पाठवतात. Captain Richard Philips ना पाच दिवसांसाठी बंदी बनवून एका lifeboat मध्ये ठेवलं जातं आणि याच चित्तथरारक पाच दिवसांचा कहाणी Captain Richard Philips यांनी या पुस्तकामध्ये सांगितली आहे. नंतर US Navy Seals च्या मदतीनं त्यांना सोडवलं जातं. 

        अतिशय सुंदर पुस्तक आहे. ज्यादिवशी Captain Richard Philips यांची सुटका झाली त्यांनंतर एक वर्षांनी हे पुस्तक प्रकाशित झालं आणि 2013 मध्ये या पुस्तकावर आधारित एक film सुद्धा Release झाली. Captain Philips असं त्या film च नाव आहे. पुस्तक आणि film दोन्ही खूप interesting आहे.



3. Himalayan Blunder - Brigadier John Dalvi

        हे पुस्तक ब्रिगेडियर जॉन दलवी यांनी लिहिलं आहे.ते भारतीय सैन्यदलात No. 7 ब्रिगेड चे कमांडर होते आणि 1962 च्या भारत - चीन युद्धामध्ये सुद्धा ते सहभागी होते. भारत - चीन युद्धानंतर त्यांना चिनी सैन्याने 7-8 महिन्यांसाठी युद्धकैदी (POW - Prisoner's/Prisoner Of War) बनवलं. आणि त्यानंतर 4 मे 1963 मध्ये त्यांना भारतात आणलं गेलं. 

        भारतात परतल्यानंतर तत्कालीन रक्षामंत्री आणि सैन्यदलप्रमुख दोघांनी ब्रिगेडियर जॉन दलवी यांना भारताची युद्धतत्परता, 1962 च्या युद्धाची कारणे, 1962 च्या युद्धातील अपयशाची कारणे तसेच भविष्यात असे प्रसंग टाळण्यासाठी सरकारने कोणती पाऊले उचलली पाहिजेत यासर्व बाबींवर एक अहवाल तयार करण्यास सांगितले.

        ब्रिगेडियर जॉन दलवी यांनी त्यांचा अहवाल तयार करून रक्षामंत्री व सैन्यदलप्रमुख यांच्याकडे सोपवला परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो अहवाल कधीच संसदेसमोर आला नाही आणि प्रसारमाध्यमांसमोर येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यानंतर ब्रिगेडियर जॉन दलवी यांनी हे पुस्तक लिहिलं ज्याचं नाव Himalayan Blunder अस आहे. 

        भारतात हे पुस्तक विकण्यास काही वर्षं बंदी घालण्यात आली होती पण नंतर ती उठवण्यात आली.ज्याअर्थी एवढ्या सगळ्या घडामोडी घडल्या त्याअर्थी पुस्तकात सांगितलेली माहितीसुद्धा धक्कादायक असणं ही एक साहजिक बाब आहे.

        पुस्तकात जॉन दलवी यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली आणि जी आजसुद्धा बऱ्याच तज्ञांकडून तुम्हाला ऐकायला मिळेल ती म्हणजे " हे युद्ध भारतीय सैनिक फक्त आणि फक्त प्रबळ इच्छाशक्तीवर लढले होते त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे नव्हती, गरम कपडे नव्हते आणि कोणताही Intelligence Report सुद्धा नव्हता " पुस्तक वाचताना तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल.


तर हि होती या आठवड्याच्या ३ पुस्तकांची brief summary मला खात्री आहे कि हि पुस्तक तुम्ही नक्की वाचाल.

अशाच दर्जेदार पुस्तकांची यादी द्यायला पुन्हा येईन मी पुढच्या रविवारी तोपर्यंत मला कळवायला विसरू नका वरची ३ पुस्तक वाचली का ? आणि वाचली असली तर तुम्हाला कशी वाटली.



My Instagram ID - @poemswithakshay
My Twitter ID - @AkshaySalunkheS
My Email ID - akshaysalunkhecivil@gmail.com