3 . पुस्तक बिस्तक - Boring Sunday ( Top 3 Books )
तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या पुस्तकं- बिस्तक Series मध्ये तर याही आठवड्यात मी तुमच्यासाठी काही खास पुस्तकं घेऊन आलोय. सुरुवात करूयात आपल्या Series ला ज्याचं नाव आहे पुस्तक-बिस्तक.
1. पावनखिंड - रणजित देसाई
बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राण पणाला लावून घोडखिंड लढवली आणि महाराजांचे प्राण वाचवले.अस म्हणतात की त्यांचे प्राण गेल्यानंतर सुद्धा ते बराच वेळ लढत होते कारण त्यांनी महाराजांना वचन दिले होते जोपर्यंत तोफेचा आवाज त्यांच्या कानी पडत नाही तोपर्यंत ते प्राण सोडणार नाहीत.
बाजीप्रभूच्या अतुलनीय शौर्याचे वर्णन या पुस्तकात केलेले आहे.आजही हे पुस्तक ऐतिहासिक पुस्तकांच्या यादीत Top 10 मध्ये आहे.
हे पुस्तक Cold War च्या वेळेला KGB आणि CIA यांनी केलेल्या कारवायांवर आधारलेलं आहे. जस की तुम्हाला माहीत आहे KGB ही एक Russian Intellience Agency आहे आणि CIA ही American Intelligence Agency आहे.
तसेच या पुस्तकामध्ये अनेक गोष्टींचा धक्कादायक खुलासा केलेला आहे. जस की CIA चे कोणत्या भारतीय राजनैतिक पक्षाशी संबंध होते ? भारतीय मंत्रिमंडळामधल्या कोणत्या नेत्याचे CIA शी संबंध होते ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील.
पुस्तकामधले काही पुरावे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील.
Sir Arthur Connan Doyale यांची ही पहिली कादंबरी आहे. ज्यामध्ये शेरलॉक होम्स आणि डॉ. जेम्स वॉटसन यांची भेट होते.तर या पुस्तकात इ.जे. ड्रेबर नावाचा एक मनुष्य आहे ज्याचा खून झाला आहे.आणि या खूनाचं Investigation करण्यासाठी Scotland Yard Police Department चे दोन ऑफिसर ग्रेगसन आणि लेस्ट्रार्ड यांनी शेरलॉक होम्सला पाचारण केलं आहे.
होम्स या प्रकरणाचा तिढा अगदी तर्कशुद्ध पद्धतीने सोडवतो. आणि खुनापाठीमागचं कारण सुद्धा सांगतो. पुस्तकातलं प्रत्येक ठिकाण हे काल्पनिक जरी असलं तरी तुम्हाला ते खरंच वाटतं. लेखकाची शैली इतकी सुंदर आहे कि पुस्तक तूम्हाला अक्षरशः खिळवून ठेवतं.
बऱ्याच वेळा काही गोष्टींची तर्कसंगती लवकर लागत नाही त्यासाठी तुम्हाला तो प्रसंग परत परत वाचावा लागतो. पुस्तक तुम्हाला एका सफरीवर घेऊन जाईल एवढं मात्र नक्की.
तर हि होती या आठवड्याच्या ३ पुस्तकांची brief summary मला खात्री आहे कि हि पुस्तक तुम्ही नक्की वाचाल.
अशाच दर्जेदार पुस्तकांची यादी द्यायला पुन्हा येईन मी पुढच्या रविवारी तोपर्यंत मला कळवायला विसरू नका वरची ३ पुस्तक वाचली का ? आणि वाचली असली तर तुम्हाला कशी वाटली.
My Instagram ID - @poemswithakshay
My Twitter ID - @AkshaySalunkheS
My Email ID - akshaysalunkhecivil@gmail.com


0 टिप्पण्या
तुम्हाला काही अडचण आल्यास मला संपर्क करण्यास विसरू नका.