2. पुस्तक बिस्तक - Boring Sunday ( Top 3 Books )
तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या पुस्तकं- बिस्तक Series मध्ये तर याही आठवड्यात मी तुमच्यासाठी काही खास पुस्तकं घेऊन आलोय.
मागील आठवड्यात काही जणांनी मला Message केला कि मराठी पुस्तकांवर मी भर देत नाही मित्रानो कसं आहे कि बऱ्यापैकी जणांनी मराठीमधली ऐतिहासिक पुस्तक वाचली आहेत त्यामुळे ज्या पुस्तकांची माहिती तुमच्याकडे already आहे तीच माहिती तुम्हाला परत सांगणं काही बरोबर नाही.आणि जी पुस्तकं नाटक किंवा एकांकिका या प्रकारात येतात ती तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आवडणार नाहीत असं मला वाटतं, त्यामुळे माझा भर हा English पुस्तकांवर असू शकतो.
याचा अर्थ असा नाही कि मी मराठी पुस्तकांना यामधून वगळणार आहे पण तुलनेने मराठी पुस्तकांच्या Summary ची संख्या कमी असेल कारण मराठी पुस्तकांची Summary बनवायला उशीर लागतो कारण मराठी पुस्तकं थोडीशी Vast असतात. असो आता मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सुरुवात करूयात आपल्या Series ला ज्याचं नाव आहे पुस्तक-बिस्तक
पुस्तक-बिस्तक :- दुसरा रविवार
१. The Last Leaf - O' Henry ( English )
तर The Last Leaf असं या पुस्तकाचं नाव आहे. वॉशिंग्टन Square जवळच्या एका शहराचं यात वर्णन केलं आहे या शहरामध्ये खूप सारे चित्रकार राहतात.याच शहरातल्या एका चांगल्या अपार्टमेंट मध्ये Sue आणि Johnsy या दोन मैत्रिणी राहतात.
खरतर या दोघीही वेगवेगळ्या शहरातल्या आहेत पण काही दिवसांपूर्वीच या दोघींची एका रेस्टॉरंट मध्ये भेट झाली आणि त्या दोघी मैत्रिणी झाल्या. काही दिवसांनी त्या शहरामध्ये थंडीची एक जोरदार लाट येते आणि Johnsy आजारी पडते जेव्हा डॉक्टर येऊन check करतात तेव्हा कळतं कि तिला Pneumonia झालेला आहे.
काही दिवसांनी डॉक्टर परत येतात तेव्हा कळतं Johnsy ची तब्येत आणखी खालावलेली आहे डॉक्टर Sue ला बोलावून घेतात आणि सांगतात कि Johnsy उपचारांना प्रतिसाद देत नाहीये आणि त्याच कारण तिची तब्येत नसून तिची मानसिकता आहे. तिला मनातून जर असं वाटत असेल कि ती बरी होणार नाहीये तर डॉक्टरांच्या उपचारांना काहीच अर्थ उरणार नाही.
काही दिवसात Sue ला कळतं कि Johnsy च्या bedside ला लागून असणाऱ्या window च्या बाहेरच्या बाजूला एक रोप आहे आणि दिवसेंदिवस त्याचं प्रत्येक पान गळत चाललं आहे. आणि Johnsy Sue ला सांगते कि ज्यादिवशी या रोपाचा शेवटचं पण गळेल त्यादिवशी तीसुद्धा या जगात नसेल. Sue याबद्दल खूप विचार करते आणि त्याच अपार्टमेंट मध्ये राहत असणाऱ्या मिस्टर बर्मन नावाच्या चित्रकाराला बोलावून घेते.
आणि त्यांना हुबेहूब एका रोपाची प्रतिकृती Johnsy च्या जवळ असणाऱ्या Window वर काढायला सांगते आणि त्या रोपाला दररोज एक पान जोडण्यास सांगते. Johnsy दिवशी उठते त्या वेळी तिला दिसत कि शेवटचं पान रोपाला तसेच आहे.हे पाहून ती थोडी नाराज होते कारण तिची अपेक्षा वेगळीच असते त्यादिवशी रात्री खूप जोराचा पाऊस होतो त्यामुळे Johnsy ला असं वाटत कि शेवटचं पान उद्या नक्कीच पडेल आणि तो दिवस तिचा शेवटचा दिवस असेल.
पण सकाळी उठून ज्यावेळी ती बघते त्यावेळी तिला दिसत कि ते पण अजुनपण तसच आहे.एक आठवडाभर हे असच घडत असतं. नंतर डॉक्टर येऊन Johnsy ला बघतात आणि सांगतात कि ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. नंतर एक दोन दिवसात सुई ला कळतं कि मिस्टर बर्मन यांचं Pnuemonia मुळे निधन झालं आहे.
Johnsy विचारते कि मिस्टर बर्मन असे अचानक कसे गेले तर Sue सांगते कि मागील आठवडाभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि अशा पावसात ते तुझ्या Window च्या बाहेर चित्र काढत होते. त्याच रोपाचं चित्र ज्या रोपामुळे आज तू बरी झालीस.
तुझी मानसिकता बदलणं हे तुझ्या रोगाचं औषध होतं.आणि ते औषध देण्याचं काम मिस्टर बर्मन करत होते. खरंतर Sue हि मुलगी आहे कि मुलगा आहे याबद्दल खूप तर्कवितर्क आहेत पण मी Sue ला मुलगी म्हणून Refer केलं आहे. पुस्तक खूपच चांगलं आहे एखाद्या माणसाचं मन, त्याची मानसिकता यावर भाष्य करणार हे पुस्तक आहे.
तस पाहिलं तर रोपाची सगळी पानं झडल्यानंतर आपलं जीवन सुद्धा संपेल अशी Johnsy ला भीती वाटत होती पण वास्तविकदृष्ट्या ती एक अंधश्रद्धा होती पण ती अंधश्रद्धा जर Sue ने पाळली नसती तर Johnsy ची तब्येत खालावली असती आणि तिची मानसिकता बदलणं आणि तिचं बरं होणं हे त्या अंधश्रद्धेपेक्षा फार महत्वाचं होतं.
Sue ची मैत्रीनिष्ठा आणि Johnsy वर असणारं प्रेम यातून दिसून येतं.हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा खूप Interesting पुस्तक आहे.
२. Mans Search For Meaning - Viktor E. Frankl ( English, Marathi )
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला नाझी जर्मनीने युरोपातील बरेच देश वेगाने जिंकून घेतले.आणि जिंकलेल्या देशातील सैनिक आणि लोकांना कैदी बनवून त्यांना concentration camps मध्ये पाठवलं. खरंतर पुस्तकाच्या सुरुवातीला concentration camps मधल्या जीवनावर थोडंसं भाष्य केलं आहे आणि त्यानंतर लेखकानं त्याचा concentration camp मधला अनुभव सांगितलं आहे.
लेखक सांगतो कि concentration camp मध्ये लोकांकडून आठवडाभर राबवून घेतले जात असे आणि त्याबदल्यात त्यांना पावाचा एखादा छोटासा तुकडा दिला जाई.अशा पद्धतीने काही लोक अशक्तपणा येऊनच मरून गेले.लेखक हा पेशाने डॉक्टर आहे आणि त्याने logotherapy बद्दल सुद्धा सांगितलं आहे.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये मानवी मनाचं महत्व काय असत , आपल्या आयुष्यात येणार प्रत्येक क्षण आपल्याला काय सूचित करत असतो यावर थोडं भाष्य केलेलं आहे. तसेच जर कठीण प्रसंगामध्ये तुम्ही तुमचं मन ढळू दिलं नाहीत तर तुम्ही त्या प्रसंगातून व्यवस्थितपणे बाहेर पडता.परंतु तुम्ही जर डगमगून हार मानलित तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावून बसता.
खासकरून नाझी concentration camps मध्ये जीव वाचवण्यासाठी आत्मविश्वास गरजेचा होता.बऱ्याच जणांनी स्वतः चा आत्मविश्वास गमावला परिणामी त्यांना त्यांचा जीवसुद्धा गमवावा लागला.मानवी मन, त्याची ताकद, आयुष्यात येणारे वैविध्यपूर्ण प्रसंग आणि त्या प्रसंगांचा मतितार्थ (दडलेला अर्थ) याची सांगड या पुस्तकात घालून दिलेली आहे.
खऱ्या आयुष्यातील प्रसंगांशी तुलना केल्यामुळे लेखकाचे विचार लगेच पटतात.पुस्तकांच्या summary मधून हे पुस्तक समजणं थोडं अवघड आहे त्यामुळे मी असं सांगीन हे पुस्तक एकदा जरूर वाचा.
३. वाईज अँड अदरवाईज - सुधा मूर्ती
( Available in English, Marathi and Various other languages )
भारताच्या आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांनी बसनंही प्रवास केला आहे. या भागात अठराविश्र्वे दरिद्र्यात राहणार्या माणसांच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा नेऊन पोचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या या कार्यामुळेच समाजाच्या विविध स्तरांतील असामान्य व्यक्तिंच्या सहवासात त्या आल्या. मग ते मुंबईतून उठून जाऊन भूकंपग्रस्त गुजरातमध्ये स्थायिक होणारं भिकार्याचं कुटुंब असो, हुंड्यासाठी बळी गेलेल्या एका तरुणीची माता असो... नाही तर मोठ्या रकमेचा चेक देणगी म्हणून पाठवणारा अनामिक दाता असो...
या सर्वांमुळे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणार्या कहाण्यांमुळे आणि त्यांच्या मुलखावेगळ्या जीवनविषयक तत्वज्ञानामुळे सुधा मूर्तीचं जीवन समृध्द होऊन गेलं आहे.आयुष्यात येणाऱ्या चांगल्या आणि वाईट माणसांचे अनुभव त्यांनी उत्तमप्रकारे सांगितले आहे त्यांच्या ओघवत्या शब्दांमुळे प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. पुस्तक खूप चांगले आहे, मराठीत अनुवादित झालेले आहे जरूर वाचा.तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर refresh झाल्यासारखं वाटेल.
Credits - www.Akshardhara.com
तर हि होती या आठवड्याच्या ३ पुस्तकांची brief summary मला खात्री आहे कि हि पुस्तक तुम्ही नक्की वाचाल.
अशाच दर्जेदार पुस्तकांची यादी द्यायला पुन्हा येईन मी पुढच्या रविवारी तोपर्यंत मला कळवायला विसरू नका वरील ३ पुस्तक तुम्ही वाचली का ? आणि वाचली असली तर तुम्हाला कशी वाटली.माझ्या Social Media links खाली दिलेल्या आहेत.
My Instagram ID - @poemswithakshay
My Twitter ID - @AkshaySalunkheS
My Email ID - akshaysalunkhecivil@gmail.com


0 टिप्पण्या
तुम्हाला काही अडचण आल्यास मला संपर्क करण्यास विसरू नका.