तू समोर आलीस कि खूप बरं वाटतं
तुझी धीरगंभीर मुद्रा तुझं नाजूक ते हसणं
आकाशाकडे बघत लडिवाळ ते बोलणं
तुझ्या शब्दांच्या पावसात मला भिजावंसं वाटतं
का कुणास ठाऊक पण तू समोर आलीस कि खूप बरं वाटतं
विषयाला सोडून तू कधी भरकटत नाहीस
जगाच्या गप्पांमध्ये तुला Interest च नाही
तुझ्या अभ्यासावरचा Focus बघून मला आश्चर्यच वाटतं
का कुणास ठाऊक पण तू समोर आलीस कि खूप बरं वाटतं
झोप आली तरी लक्ष देण्यासाठी
केलेला तो प्रयत्न
काही कळत नसलं तरी शांत
बसण्यासाठी केलेला तो यत्न
तुझ्या आठवणींमध्ये मन माझं ठाण मांडून बसतं
का कुणास ठाऊक तू समोर आलीस कि खूप बरं वाटतं
तू काहीही सांगत असलीस तरी
मला समजत नसतं
कारण माझं लक्ष फक्त तुझ्या
डोळ्यांकडे असतं
तुझ्यासोबत गप्पा मारत
तासनतास बसावसं वाटतं
का कुणास ठाऊक तू समोर आलीस कि खूप बरं वाटतं
--------------- अक्षय साळुंखे


0 टिप्पण्या
तुम्हाला काही अडचण आल्यास मला संपर्क करण्यास विसरू नका.