बऱ्याच दिवसांनी..... 1. पुस्तक बिस्तक - Boring Sunday ( Top 3 Books )

So आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय माझ्या hectic schedule मुळे मला ब्लॉग update करणं जमलं नाही  I am sorry पण हो  या आठवड्यापासून दर रविवारी मी अशा ३ पुस्तकांची तुम्हाला माहिती देणार आहे जी तुम्ही वाचली पाहिजेत असं मला वाटतं.


पुस्तक-बिस्तक :- पहिला रविवार 


१. Man Eaters of  kumaon ( English, Marathi )

हे पुस्तक ब्रिटिश इंडियन हंटर जिम कॉर्बेट नि लिहिलंय त्याने उत्तराखंड मध्ये मारलेल्या नरभक्षक वाघांच्या रोमांचक कथा या मध्ये आहेत. हे पुस्तक ज्या पद्धतीनं लिहिलंय त्यामुळे वाचक एका जंगल सफरीवर जातो आणि पुस्तक वाचून झाल्यावर त्याची ती जंगल सफर संपते. आणि हे पुस्तक वाचल्यांनंतर एखादी जंगल सफर केल्याचा तुम्हाला भास होईल. So हे पुस्तक जरूर वाचा.

२. रारंग ढांग ( Marathi )

प्रभाकर पेंढारकरांनी लिहिलेलं हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. एका सिव्हिल इंजिनीयरवर हि गोष्ट आधारलेली आहे. जो आर्मी च्या road construction युनिट मध्ये काम करतोय. आणि हिमालयीन वातावरणाबद्दल जो पूर्णपणे अनभिज्ञ आहे. आणि या त्याच्या अनभिज्ञतेमुळे त्याच्या आयुष्यात कोणकोणती स्थित्यंतरं येतात ते या पुस्तकात सांगितलं आहे.पेंढारकर यांनी अत्यंत वेगळा विषय रोचक पद्धतीनं हाताळला आहे. हिमालयात रस्ते बांधणारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सैन्यदलातील इंजिनिअरिंग विभाग, बॉर्डर रोडचा प्रमुख, टास्क फोर्स कमांडर्स या वेगळ्याच जगाबरोबर माणसांना आणि यांत्रांनाही थकविणारी हिमालयाची उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी हवा, विलक्षण थंडी, दरडी कोसळणं, रक्त गोठवणारा बर्फ अशा बेभरवशी निसर्गाचं दर्शन घडतं. दुसरीकडे वेगवेगळ्या स्वभावाची माणसंही भेटतात. माणसं आणि निसर्ग यांचं नातं गुंफणारं, संघर्ष दाखविणारं वेगळं कथानक आकाराला येतं. पेंढारकरांची शैली चित्रमय आहे. त्यामुळे प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात. वाचक त्यात गुंतून पडतो.

                                                                                                             Credits - www.Bookganga.com

३. Rich Dad Poor Dad ( English )

आपण आपल्या आयुष्यातली किमान १५ वर्षे  शिक्षण घेतो. पण आपल्याला शाळेत पैसे आणि त्याची गुंतवणूक याबद्दल काहीच सांगितले जात नाही आणि परिणामी बरेच जण पैसे कमावण्यासाठी किंवा फक्त पैशांसाठी  काम करू लागतात पण पैसे त्यांच्यासाठी कधीच काम करत नाहीत कारण त्यांना गुंतवणुकीचे ज्ञान नसते.आणि याच ज्ञानाबद्दल Robert kiyosaki यांनी या पुस्तकातून सांगितले आहे. हे पुस्तक International Bestseller आहे. आजपर्यंत या पुस्तकाचं ३.२ कोटी प्रति विकल्या गेल्या आहेत.मी तुम्हाला Suggest करीन कि तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा.

तर हि होती या आठवड्याच्या ३ पुस्तकांची brief summary मला खात्री आहे कि हि पुस्तक तुम्ही नक्की वाचाल.
अशाच दर्जेदार पुस्तकांची यादी द्यायला पुन्हा येईन मी पुढच्या रविवारी तोपर्यंत मला कळवायला विसरू नका वरची ३ पुस्तक वाचली का ? आणि वाचली असली तर तुम्हाला कशी वाटली.


My Instagram ID - @poemswithakshay
My Twitter ID - @AkshaySalunkheS
My Email ID - akshaysalunkhecivil@gmail.com